आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार:चांदवड बाजार समितीच्या प्रारंभ मतदार याद्या जाहीर

चांदवड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजार समितीने मतदारांच्या प्रारंभ याद्या बाजार समिती, पंचायत समिती व उपनिबंधक कार्यालय या तीन ठिकाणी सोमवारी प्रसिद्ध केल्याची माहिती प्रशासक अनिल पाटील व सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी दिली.

निवडणुकीसाठी २२७६ मतदार आहेत. त्यात सोसायटी गटात १०१२, ग्रामपंचायत गटात ८३६, व्यापारी गटात ३१९ व हमाल मापारी गटात १०९ मतदार असणार आहेत. प्रसिद्ध झालेल्या प्रारंभ याद्यांवर दि. १४ ते दि. २३ नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदविता येणार आहे. बाजार समितीकडे आलेल्या हरकतींवर २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत सुनावणी केली जाणार आहे. ७ डिसेंबरला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

बाजार समितीच्या एकूण १८ जागांपैकी सोसायटी गटासाठी एकूण ११ जागा आहेत. त्यात सोसायटीच्या सर्वसाधारण जागेसाठी ७, सोसायटी महिला राखीव दोन, सोसायटी (भजविज) एक व सोसायटी (ओबीसी) एक आहेत, तर ग्रामपंचायत गटासाठी एकूण चार जागा आहेत.

बातम्या आणखी आहेत...