आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:एन्झोकेम विद्यालयाची दीक्षा, कापसे तालुक्यात द्वितीय

येवला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एन्झोकेम हायस्कूल व श्रीमान गं.छ.शेठ उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के,वाणिज्यचा ९९.१३ तर कला शाखेचा निकाल ९३ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेत दीक्षा कापसे (९२.८७ टक्के) केंद्र व विद्यालयात प्रथम क्रमांकाने व तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

आदित्य डमरे (९१.१७ टक्के) द्वितीय तर ऋतुजा आरखडे (८९.८३ टक्के) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. वाणिज्य विभागात मानसी हिरे ८५.८३ टक्के मिळवून प्रथम, कल्याणी जाधव (७९.५० टक्के ) द्वितीय,चैताली जाधव (७८.६७ टक्के ) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. कला शाखेत संकेत जेजूरकर (८२.८३ टक्के ) प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. मानसी गरुड (७९.५० टक्के ) द्वितीय तर पूनम खैरे (७९.३३ टक्के ) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष पंकज पारख, उपाध्यक्ष रमेश पटेल आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...