आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहानगरपालिकेच्या राष्ट्रीय उपजीविका अभियान विभागा अंतर्गत तयार करण्यात आलेल्या जिव्हाळा शहरी बेघरासाठी निवारा या पंचशील हॉटेल पाठीमागील निवारा गृहाची राज्य निवारा संनियत्रंण समितीकडून पाहणी करण्यात आली. शहरी बेघरांसाठी सर्वोच्च न्यायालय नियुक्त राज्य निवारा संनियंत्रण समितीचे अध्यक्ष उज्ज्वल उके, महेंद्र कांबळे यांच्यासह नगर परिषद प्रशासन संचालनालय, मुंबईचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, राज्य अभियान व्यवस्थापक रवींद्र जाधव, प्रसाद राजेभोसले यांनी पालिका बेघरासाठी निवारा केंद्राला भेट दिली.
येथील देखभाल व व्यवस्थापन कामी नियुक्त करण्यात आलेल्या राईट वे सामाजिक, शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष यांना समितीचे सदस्य यांनी केंद्रातील सोयीसुविधा बाबत माहिती जाणून घेतली. समितीने बेघर निवारा केंद्रात राहत असलेल्या लाभार्थी नागरिकांशी संवाद साधून चर्चा केली. पालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या बैठकीत राज्य निवारा संनियंत्रण समितीचे इतर दोन सदस्य प्रमिला जारग व ब्रिजेशकुमार आर्य हे ऑनलाइन उपस्थित होते.
३६ लाभार्थी
महापालिकेच्या जिव्हाळा निवारा केंद्रात ३६ सद्य स्थितीतील लाभार्थी आहेत. लाभार्थी यांचे राष्ट्रीयीकृत बँकेत बचत खाते उघडणे, लाभार्थींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे, लाभार्थी यांना रोजगार उपलब्ध करुन देणे, महिला लाभार्थी यांचे स्वयं सहायता बचत गट तयार करणे, निवाराचा वाढदिवस आणि निवाऱ्यातील लाभार्थ्यांचा वाढदिवस साजरा करणे, लाभार्थींची नियमित वैद्यकीय तपासणी करणे, लाभार्थी यांची मतदार नोंदणी करणे, लाभार्थी यांचे आधार कार्ड तयार करणे या सारख्या कामाची सविस्तर माहिती पालिका प्रकल्प अधिकारी रोहित कन्नोर यांनी यावेळी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.