आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदेश:मानवता हाच खरा श्रेष्ठ धर्म होय; सटाण्यात शाही इमाम मौलाना मोहम्मद कासीम रजा कादिर यांचा संदेश

सटाणा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम समाजबांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले. जामा मशिदीचे शाही इमाम मौलाना मोहम्मद कासीम रजा कादिर यांचा लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार करून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

मंगळवारी सकाळी नऊ वाजता येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाजपठण केले. शाही इमाम मौलाना मोहंमद कासीम रजा कादिर यांनी देशात धर्माच्या नावाखाली अराजकता पसरवून दोन धर्मांत तेढ निर्माण करणे चुकीचे असून मानवता हीच सर्व धर्मांची शिकवण असून मानवता हाच खरा श्रेष्ठ धर्म आहे, असे सांगून ईदच्या नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी गळा भेट करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. सर्वधर्मीय बांधवही शुभेच्छा देण्यासाठी याठिकाणी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, तहसिलदार जितेंद्र इंगळे पाटील, पोलिस उपविभागीय अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी, निरीक्षक सुभाष अनमूलवार, सहाय्यक निरीक्षक किरण पाटील, वर्षा जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी विजय देवरे, दिलीप सोनवणे, पोपट बच्छाव, आरपीआयचे शहराध्यक्ष भारत बच्छाव, प्रकाश बच्छाव, भीमराव पवार, तलाठी जयप्रकाश सोनवणे, अशोक चौरे यांच्यासह मुस्लिम पंच कमिटीचे सरपंच अल्ताफ मुल्ला, फारुख तांबोळी, रज्जाक मुल्ला, हाजी नइम गुलाम, अझहर मन्सूरी, डी.एम.शेख, शकील पटेल, मोहसीन मन्सूरी, शफिक मुल्ला, शाकिर मणियार, सलीम शेख, मोबिन शहा, असलम मन्सूरी, आरिफ मन्सूरी, सलीम मन्सूरी, हलीम मणियार, आझम शहा, तबरेज मन्सूरी, मोहसीन शहा, हाजी इलियास शेख, आरिफ मन्सूरी आदींसह मुस्लिम बांधव उपस्थित होते. फारूक तांबोळी यांनी प्रास्तविक केले.

बातम्या आणखी आहेत...