आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिफाड तालुक्यातील शिंगवे ग्रामपालिकेच्या अटीतटीच्या लढतीत जय मल्हार पॅनलने १० जागांसह सरपंचपद मिळविण्यात यश मिळवले तर प्रतिस्पर्धी शंकरपुरी महाराज पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले. जय मल्हार पॅनलचे सरपंचपदाचे उमेदवार सुशीला प्रभाकर पवार (१६४९) या विजयी झाल्या.
जय मल्हार पॅनलचे वॉर्डनिहाय विजयी उमेदवार वॉर्ड क्र १. साहेबराव रायते (४९१ मते), दत्तात्रेय कोरडे (४९१), मंदा शिंदे (४४०), वॉर्ड क्र. २ शकुंतला गिते(३९०), शुभांगी माने (४६१),वॉर्ड क्र.४ संप्रदा शिंदे, (अविरोध), राहुल कटारे (अविरोध),वॉर्ड क्र.५ भाऊलाल डेर्ले (५८९), शालिनी चिंधू सानप (६२०), ज्योती पवार (५१३).
तसेच शंकरपुरी महाराज पॅनलचे विजयी उमेदवार : वॉर्ड क्र. २ भास्कर डेर्ले (३९१), वॉर्ड क्र.३, जयश्री रायते (२९४), गोरख कोकाटे (२८४). विजयी उमेदवारांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सरपंचपदी सुशीला प्रभाकर पवार विजयी झाल्या तर सून ज्योती चंद्रकांत पवार या वाॅर्ड क्रमांक ५ मधून विजयी झाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.