आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनपा क्षेत्रात नवीन जुन्या वितरण व्यवस्थेवर बऱ्याच नागरिकांनी अनधिकृत नळजोडणी केली आहे. वारंवार सूचना करूनही बेकायदा नळजोडणी अधिकृत करून घेण्यास टाळाटाळ होत आहे. अनधिकृत नळजोडणी असलेल्या नागरिकांनी ३० जूनपर्यंत आवश्यक शुल्क व पाणीपट्टीचा भरणा करून आपली जोडणी अधिकृत करून घ्यावी, अन्यथा डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी अॅक्टनुसार फौजदारी कारवाई करण्याचा इशारा मनपा प्रशासक तथा आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी दिला आहे. अनधिकृत नळजोडणीचा परिणाम मनपाच्या पाणीपट्टी उत्पन्नावर होत आहे. बेकायदेशीरपणे नळजोडण्या करून पाण्याचा वापर केला जात आहे. मनपाच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने अनधिकृत नळजोडण्या अधिकृत करण्याचे आवाहन होत आहे.
प्रभाग अधिकारी, प्रभाग अभियंता, पाणीपुरवठा विभाग सातत्याने नळजोडण्या अधिकृत करण्याविषयी जनजागृती करत आहेत. मात्र, या आवाहनास नागरिक दाद देत नसल्याचे दिसत आहे. नागरिकांनी २२ ते ३० जूनदरम्यान पाणीपट्टी व शुल्क भरून घ्यावे. यानंतर अनधिकृत नळजोडण्या कुठलीही पूर्वसूचना न देता खंडित केल्या जातील. नळांचे साहित्य जप्त करून यापुढे संबंधित मिळकतींना नळकनेक्शन दिले जाणार नाही. तसेच पाणीचोरीचा गुन्हा दाखल करून फाैजदारी स्वरूपाची कारवाई करणार आहे. नागरिकांनी नळजोडण्या अधिकृत करून सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त गोसावी यांनी केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.