आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविरोध निवड:चांदवड कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कैलास कोतवाल; उपाध्यक्षपदी भाऊसाहेब जाधव यांची अविरोध निवड

चांदवड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी राधिका ग्रुप व के. के. ट्रेडिंग कंपनीचे संचालक कैलास कोतवाल यांची तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब जाधव यांची अविरोध निवड करण्यात आली. कैलास कोतवाल यांनी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या सहकार पॅनलमधून सोसायटीची निवडणूक लढविली होती.

त्यात त्यांना भरघोस मते मिळाली. सहकार पॅनलचे सर्वच उमेदवार विजयी झाले. त्यात कैलास कोतवाल यांची अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक होत असून संस्थेचे मार्गदर्शक शिरीषकुमार कोतवाल यांनी कैलास कोतवाल यांचा सत्कार केला व नवनिर्वाचित सर्व संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, विजय कोतवाल, मनोहर बनकर, प्रवीण हेडा, सुशील पलोड, संतोष पांडे, आदित्य फलके, किरण हेडा, सचिन कोतवाल, पप्पू हेडा, नंदकुमार कोतवाल, सुभाष शेळके, सुभाष कोतवाल, शंकर देशमाने, विठ्ठल पगार, कुंदन शेलार, आनंद बनकर, कुसुम कोतवाल, संगीता जाधव, दिलीप भुरे आदींसह कांदा व्यापारी व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...