आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या लक्ष्य स्पर्धेत रुग्णालयातील प्रसूतिगृह आणि शस्त्रक्रियागृहाला प्लॅटिनम मानांकन प्राप्त झाले आहे. देवळा बागलाण व सुरगाणा तालुक्यातील रुग्णदेखील या रुग्णालयात दाखल होत असल्याने प्रसुतीविषयक सेवेत दर्जात्मक वाढ झाली आहे. या रुग्णालयातील प्रसूती सेवांमध्ये मातांचे आधिकार व जबाबदाऱ्या, गुणात्मक सेवा, संसर्ग प्रतिबंधात्मक उपायोजना, स्वच्छतासेवा, नातेवाइकांची सेवा बद्दलचे अभिप्राय या सर्व बाबींमध्ये भरीव कामगिरी करून रुग्णसंख्येत, गुणात्मक व दर्जात्मक सुधारणा करण्यात आली आहे. मागच्या वर्षी बोर्डामध्ये प्रसूतिपूर्व तपासणी (ए. एन. सी.क्लिनिक) मध्ये २३२६ महिलांनी लाभ घेतला असून १९२५ मातांची प्रसूती या रुग्णालयात करण्यात आली. त्यापैकी १५७१ महिलांचे सामान्य प्रसूती झाली असून ३२५ प्रसूती सिझेरियन शस्त्रक्रियेने केल्या आहेत.
कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेत देखील रुग्णालयीन सेवांचा आलेख चढता असून कोविड कालावधी व्यतिरिक्त सप्टेंबर २०२१ पासून मार्च २०२२ पर्यंत एकूण ४१३ लाभार्थींच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. यात ७९१ महिलांना तांबी (कॉपर टी) बसण्यात आलेली आहे. गर्भ निरोधक गोळ्यांचा २२९ महिलांना लाभ देण्यात आला असून प्रसूतीपश्चात तांबी (कॉपर टी) बसण्यासाठी ३०८ महिलांनी पुढाकार घेतला आहे.
प्रसूती पूर्व, प्रसूतीवेळीच्या आणि प्रसूती पश्चात सेवेसाठी विशेष लसीकरण कक्ष विकसित करण्यात आला असून जपायगो कंपनी व रुग्णालयाचे माजी अधिपरीचारक कुणाल कोठावदे यांचे समुपदेशन व सुश्मिता अवेरे, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. नीलेश लाड, डॉ. कमलाकर जाधव, वर्षा वामोरकर, विमल शिंदे, मीना गायकवाड आदी अधिपरिचारिका कौशल्य पणाला लावत आहेत. गर्भजल चिकित्सा तज्ञ डॉ. पराग पगार यांच्या माध्यमातून ६६४ मातांना मूलभूत सोनोग्राफी चिकित्सा सेवांचा लाभ रुग्णालयातच देण्यात आलेला अाहे. रुग्णालयात असलेले रक्त साठवण केंद्राच्या माध्यमातून संक्रमण अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण यांचे निरीक्षणात रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी उदय बस्ते यांच्यासह हर्षा नांद्रे, शीतल जाधव व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांनी २७१ महिलांना प्रसूतीदरम्यान रक्त संक्रमण सुविधा दिलेली आहे.
रुग्णालयावरील विश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण रुग्णालयाचे कामकाज उत्तमरीत्या सुरू आहे. भविष्यातही पंचक्रोशीतील जनतेचा रुग्णालयावरील विश्वास वाढविण्यासाठी गुणात्मक सुधारणा करून संदर्भित करण्याचे प्रमाण घटविण्याचे उद्दिष्ट हे यावर्षी हाती घेण्यात आलेले आहे.
- डॉ. अनंत पवार, वैद्यकीय अधीक्षक, कळवण
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.