आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातांत वाढ:मनमाडजवळ भरधाव वाहनाच्या धडकेने काळविटाचा मृत्यू

मनमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड-नांदगाव महामार्गावरील हिसवळ खुर्द शिवारात आज सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत एका काळविटाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रस्त्याच्या कडेला मृत पडलेल्या काळविटाला स्थानिकांनी वनविभागाच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी एस. बी. महाले, कर्मचारी एस. एम. बेडवाल, नवनाथ आव्हाड घटनास्थळी दाखल हाेत पंचनामा केला.

मनमाड-नांदगाव मार्गाचे नव्याने काम झाल्याने या मार्गावरून नेहमी भरधाव वाहतूक सुरू असते. त्यामुळे छाेट्या-माेठ्या अपघातांत वाढ झाली आहे. साेमवारी (दि. २) सकाळी हिसवळ खुर्द शिवाराच्या दरम्यान या महामार्गावर अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या काळविटाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला. काळविटाच्या मृत्यूबाबत माहिती मिळताच बाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली. सदर भाग हा डोंगराळ असल्याने या भागात वन्य प्राण्यांचा सतत राबता असतो.

बातम्या आणखी आहेत...