आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविरोध:निफाडच्या नगराध्यक्षपदी कांताबाई कर्डिले अविरोध

निफाड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निफाडच्या नगराध्यक्षपदी निफाड शहर विकास आघाडी, शिवसेना, काँग्रेस, बसपा, अपक्ष आघाडीच्या कांताबाई अशोक कर्डिले यांची अविरोध निवड करण्यात आली.नगराध्यक्षा रूपाली रंधवे यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर निवडीसाठी पीठासन अधिकारी तथा प्रभारी तहसीलदार प्रशांंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. त्यात अर्ज दाखल करण्याच्या विहित वेळेत कांताबाई कर्डिले यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने नगराध्यक्षपदी त्यांची अविराेध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

बैठकीस उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, कांताबाई कर्डिले, रुपाली रंधवे, साहेबराव बर्डे, संदीप जेऊघाले, कविता धारराव, शारदा कापसे, पल्लवी जंगम, विमल जाधव, सुलोचना होळकर, अरुंधती पवार, रत्नमाला कापसे, अलका निकम आदी नगरसेवक उपस्थित होते. निवडीनंतर शिवाजी चौकात आयोजित कार्यक्रमात नवनिर्वाचित नगराध्यक्षा कर्डिले यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा रूपाली रंधवे, उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, वि. दा. व्यवहारे, राजाभाऊ शेलार, राजेंद्र राठी, शिवाजी ढेपले, मधुकर शेलार, विक्रम रंधवे, संपत व्यवहारे यांची भाषणे झाली. नगराध्यक्ष कर्डिले यांनी सत्काराला उत्तर दिले. याप्रसंगी नगरसेवक, कार्यकर्ते आदींसह नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...