आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक अविरोध:कसाबखेडा ग्रामपंचायत अविराेध; सरपंचपदी चव्हाण

नांदगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने कसाबखेड्याच्या सरपंचपदी सुनीता कांतिलाल चव्हाण यांची अविरोध निवड झाली. गावाच्या विकासासाठी प्रतिस्पर्धी गटातील नेत्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्णय घेतल्याने सरपंचपदासह सर्व सहा जागांची निवडणूक अविरोध पार पडली.

कांतिलाल चव्हाण, राजू चव्हाण, तुळशीराम चव्हाण, गोरख चव्हाण, कैलास पवार, भाईदास जाधव, लक्ष्मण जाधव, भावलाल चव्हाण, रमेश राठोड, प्रभू चव्हाण यांनी निवडणुकीत होणारा संभाव्य खर्च टाळून गावाच्या विकाकसासाठी भूमिका घेतल्यास गावाला त्याचा फायदा होईल अशी भूमिका मांडली. या भूमिकेचे आमदार सुहास कांदे यांनी स्वागत करत प्रतिस्पर्धी गटाला गावासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद दिल्याने येथील निवडणूक अविरोध पार पडली.

अविरोध निवडलेले सदस्य
जोरासिंग जाधव (सर्वसाधारण), जनाबाई हिरामण जाधव (नामप्र), छल्लोबाई मांगू चव्हाण (सर्वसाधारण स्त्री), संगीता मुकुंद चव्हाण (सर्वसाधारण स्त्री), किशोर चव्हाण (सर्वसाधारण पुरुष), गुलाब दत्तू चव्हाण (अनुसूचित जमाती)

बातम्या आणखी आहेत...