आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविरोध निवड:कसबे सुकेणे सरपंचपदी भंडारे

ओझर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कसबे सुकेणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अपक्ष उमेदवार आनंदराव गोपाळराव भंडारे (२१७३) यांनी विजय मिळवला. त्यांनी सत्ताधारी गटाचे सरपंचपदाचे उमेदवार छगन जाधव (१३९८) व सदाशिव शेवकर (१८७७) यांचा पराभव केला. सदस्यपदाच्या १७ पैकी सत्ताधारी शिवसेना पुरस्कृत ग्रामविकास पॅनलला ४, विरोधी राष्ट्रवादी पुरस्कृत परिवर्तन पॅनलला ९ तर अपक्षांनी तीन जागांवर विजय मिळवला.

एक जागा यापूर्वीच अविरोध निवडून आली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे नेतृत्व बाळासाहेब जाधव व सोसायटीचे अध्यक्ष विश्वास भंडारे तर विरोधी परिवर्तन पॅनलचे नेतृत्व माजी सरपंच नाना भंडारे व भाऊसाहेब भंडारे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...