आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडी उलटली:खैर लाकडाची तस्करी करणारी गाडी उलटली

बोरगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उंबरठाण परिसरातील कुकुडणे गावाजवळ बुधवारी रात्री खैराच्या लाकडाची तस्करी करणारी पिकअप (जीजे १५ झेड ३९८१) वळणावर उलटली. अपघातानंतर खैर तस्कर वाहन सोडून फरार झाले. या वाहनात वनकर्मचाऱ्यांना खैराचे २४ नग आढळले. वनकर्मचाऱ्यांनी ते ताब्यात घेतले आहे.

सहायक वनसंरक्षक हेमंत शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उंबरठाणचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे, वेलणकर, मंगेश शेळके, वनपाल रामजी कुवंर, जेजीराम चौरे, अक्षय पाडवी, हरी चव्हाण, गोविंद वाघ, तुकाराम चौधरी, बटू बागूल यांच्या पथकाने पंचनामा केला. खैराच्या लाकडांसह पिकअप वाहन उंबरठाण वनपरिक्षेत्र कार्यालयात जमा करण्यात आले आहे. या घटनेत १४ हजार रुपये किमतीचे खैर लाकूड व तीन लाखांची पिकअप असा एकूण तीन लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित पिकअपचालकासह अज्ञात तस्करांविरोधात उंबरठाण वनपरिक्षेत्र कार्यालयात गुन्हा नोंद करण्यात आला.

रगतविहीरला तपासणी नाका करण्याची नागरिकांची मागणी
गुजरात सीमेवरील बर्डीपाडा येथे वनतपासणी नाका असल्याने खैराची तस्करी करणारी वाहने मांधा-रगतविहीर या गुजरात मार्गाचा वापर करतात. या मार्गावरील सीमेवर वनतपासणी नाका सुरू करावा. यामुळे वनसंपदेच्या चोरट्या वाहतुकीस आळा बसेल, अशी मागणी अशोक भोये यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...