आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातभट्टीवर धाड:नाळीद व देसराणे येथे हातभट्ट्या उद‌्ध्वस्त; ४० हजारांचे रसायन नष्ट

कळवण3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देसराणे व नाळीद येथे कळवण पोलिसांनी छापा टाकत काळा गूळ व मोहफुलापासून दारू तयार करणाऱ्या हातभट्ट्या उद‌्ध्वस्त केल्या. ४० हजार रुपयांचे रसायन नष्ट केले आहे. यात दोघांविरोधात गावठी दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिस शोध घेत आहेत. तालुक्यातील अभोणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेरुळ ग्रामपंचायत हद्दीतील २०० महिलांनी पोलिस ठाणे गाठत अवैध गावठी दारूविरोधात एल्गार पुकारला होता. महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करीत येथील हातभट्टी उद‌्ध्वस्त केली होती. तशाच स्वरूपाच्या तक्रारी कळवण पोलिस ठाण्यात नाळीद, देसराणे, दरेभणगी परिसरातील नागरिक, महिलांनी केल्या होत्या. याची दखल घेत कळवण पोलिसांनी सकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान, देसराणे शिवारातील गिरणा नदीकाठी व नाळीद येथे मोकळ्या जागेत घराच्या आडोशाला सुरू असलेल्या हातभट्टीवर धाड टाकली.

ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक समाधान नागरे, उपनिरीक्षक महेश निकम, हवालदार मधुकर तारू, पुंडलिक डंबाळे, सचिन राऊत, जितेंद्र बोरसे, गंगू भोये, पोलिसमित्र भास्कर चव्हाण यांनी कारवाई केली. यावेळी गावठी दारू तयार करण्याचे तीन हजार लिटर रसायन, २० लिटर तयार दारू व इतर साहित्य, असे ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे. याबाबत देसराणे येथील संशयित शिवाजी श्रीपत वाघ व नाळीद येथील सुशीलाबाई पठाण वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...