आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मादी जेरबंद:लहवितला बिबट्याची मादी जेरबंद

देवळाली कॅम्पएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लहवित येथे बिबट्याची पाच वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकली असून याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. लहवित, वंजारवाडी शिवारात बिबट्याचा गत पंधरा दिवसांपासून धुमाकूळ असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती. या परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी याबाबत वनविभाग प्रशासनाला माहिती दिली होती. त्यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात पिंजरा लावला होता.

रविवारी रात्री लहवित येथील राजाराम पाळदे यांच्या शेतात बिबट्या जेरबंद झाल्याचे त्याच्या डरकाळ्यां-वरून लक्षात आले. त्यानंतर पाळदे यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. वनपाल अनिल अहिरराव, विजयसिंह पाटील आदींनी बिबट्या ताब्यात घेऊन गंगापुर येथील रोपवाटिकेत ठेवले, त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...