आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:लासलगावी प्रहार जनशक्ती पक्ष व  उत्पादक शेतकऱ्यांचे कांदा आंदोलन

लासलगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रहार जनशक्ती पक्ष निफाड तालुका व कांदा उत्पादक शेतकरी कांदा भावप्रश्नी आक्रमक भूमिका घेतली असून लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा आंदोलन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाने हे आंदोलन करण्यात आले.

सोमवारी (दि. १३) सकाळी लासलगाव बाजार समितीच्या आवारात प्रहारचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष शरद शिंदे व उपजिल्हाप्रमुख सागर निकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३० रुपये किलो हमीभाव मिळावा, केंद्र सरकारने नाफेडमार्फत तीस रुपये किलो दराने कांदा खरेदी करावा, १ मार्च ते ३१ मे या कालावधीत कमी दराने विकलेल्या कांद्याला एक हजार रुपये क्विंटलला हमीभाव द्यावा आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

शेकडो शेतकऱ्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना पत्रव्यवहार करत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हा सरचिटणीस समाधान बागल, नाशिक शहराध्यक्ष श्याम गोसावी, तालुकाध्यक्ष दिगंबर वडघुले, उपाध्यक्ष राहुल सोनवणे, तालुका संघटक नाना सांगळे, उपशहराध्यक्ष शेरखान मुलानी, तालुका सचिव अरुण थोरे, दत्ता आरोटे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणेही अवघड
^कांद्याचा उत्पादन खर्च २० ते २५ रुपये येत असताना शेतकऱ्यांना सरासरी ८ ते १० रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे.
- अरुण थोरे, निफाड तालुका सचिव, प्रहार जनशक्ती पक्ष

बातम्या आणखी आहेत...