आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात विराेधकांचा सफाया हाेत आहे. श्रीमंत व्यक्ती धनदांडगे बनत असून सामाजिक दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशाची ४० टक्के संपत्ती एक टक्का व्यक्तींच्या हातात सामावली आहे. सत्तेचा दुरुपयाेग करून लाेकशाही मूल्ये पायदळी तुडवून हुकूमशाहीची पायभरणी हाेत असल्याची टिका जमात – ए – इस्लामी हिंदचे राज्य सचिव जफर अन्सारी यांनी केली. शहरातील हबीब लाॅन्समध्ये रविवारी एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले हाेते.
यावेळी मार्गदर्शन करताना अन्सारी यांनी देशाच्या राजकीय व सामाजिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली. सत्य बाेलणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. तपास यंत्रणांना हाताशी धरुन विराेध करणाऱ्यांना तुरुंगात डांबले जाते. मीडिया विकला गेल्याने सत्य गाेष्टी लपविण्याचे काम हाेत आहे. सरकारची हुजरेगिरी करुन सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनापदे देऊन सन्मानित केले जात आहे.
लाेकशाही प्रधान देशात आज लाेकशाहीच धाेक्यात आल्याचे दुर्दैवी चित्र असल्याचे अन्सारी यांनी स्पष्ट केले. मुस्लिम पर्सनल लाॅ बाेर्डचे सचिव माैलाना उमरैन महेफूज रहेमानी यांनी मुस्लिम समाजाला विकासाच्या प्रवाहात सहभागी हाेण्याचे आवाहन केले. अंतर्गत हेवेदावे साेडून एकत्र येण्याचा सल्ला दिला. अल्पसंख्यांक समाजाला वेठीस धरणारे कायदे आणले जात आहे. बेताल वक्तव्य करुन हेतुपुरस्कार त्रास देण्याचे उद्याेग सुरु आहेत.
तरीही मुस्लिमांनी संयम राखून परिस्थितीचा सामना करावा असे जमात इस्लामीचे जिल्हाध्यक्ष फिराेज आझमी सांगितले. याप्रसंगी अॅड. मुसद्दीक माेमीन, महिला आघाडीच्या साजेदा बाजी, अब्दुल अजीम फलाई, शाहिद रमजान फेमस, फजलू रहेमान अब्दूल बारी, माैलाना जाहिद अय्यूबी, अब्दुल मुजीब शेख यांच्यासह महिला व पुरुष माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.