आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुसळगाव-गुळवंच शिवारातील इंडिया बुल्स कंपनी व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संयुक्त सेझमधील २५० एकर जमीन स्टाइस संस्थेच्या विस्तारासाठी भाडेपट्ट्याने द्यावी, अशी मागणी स्टाइसने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी स्टाइसचे अध्यक्ष नामकर्ण आवारे, उपाध्यक्ष सुनील कुंदे, संचालक अरुण चव्हाणके, विठ्ठल जपे, व्यवस्थापक कमलाकर पोटे यांनी त्यांची भेट घेऊन प्रश्न मांडले.
स्टाइसने स्वमालकीच्या ४१० एकर जमिनीवर स्वनिधीतून उद्योगांसाठी आवश्यक उत्तम पायाभूत सुविधा उभारल्या. त्यामुळे ५५७ भुखंडावर ३७७ उद्योग यशस्वीरित्या सुरू आहेत. ५०-६० उद्योग घटक निर्यातक्षम उत्पादन घेतात. त्यामाध्यमातून देशासाठी कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देत आहे.
संस्थेच्या कार्यक्षेत्रात २५,५०० कामगार काम करत शासनाच्या मदतीशिवाय स्वनिधीतून गेली ४० वर्षे संस्था उत्तमप्रकारे औद्योगिक विकासाचे व रोजगारनिर्मितीचे काम करत असल्याचे अध्यक्ष आवारे यांनी सावंत यांच्या निदर्शनास आणून दिले. मुसळगाव-गुळवंच शिवारातील इंडिया बुल्स कंपनी व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचे संयुक्त सेझमधील एकूण २५०० एकर जमिनीपैकी १३ वर्षांपासून १४२५ एकर विनावापर पडून आहे.
माळेगाव-गुळवंच जलवाहिनी करताना नळजोडणी द्या
संस्थेच्या १७ किमी लांबीच्या स्त्याच्या दुतर्फा बंदिस्त गटाराचे बांधकाम करणे, संस्थेची अंतर्गत पाइपलाइन व मुख्य पाइपलाइन नवीन टाकण्याच्या कामासाठी निधी द्यावा, मुसळगाव शिवारातील गट नं. ९७१/ १ क्षेत्र ०३ हे. ६१ आर. ही जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ चे प्रकरण-६ मधून रद्द करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी मुंबई यांना आदेश द्यावेत, सेझच्या क्षेत्रातील उद्योग तसेच प्रकल्पधारकांच्या उद्योगासाठी माळेगाव ते गुळवंचपर्यंत पाइपलाइन करताना स्टाइस संस्थेकरिता नळजोडणी मिळावी, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.