आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याचा हल्ला:द्याने परिसरात बिबट्याचा हल्ला; वासरू जखमी

नामपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

द्यानेसह परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. नामपूर - ताहाराबाद रस्त्यावरील अरुण कापडणीस यांच्या शेतात रात्री १२ वाजेच्या सुमारास बिबट्याने वासरांवर हल्ला केल्याने गाईने हंबरडा फाेडल्याने रखवालदारास जाग आली. त्याने आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठाेकली.

परिसरात गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याची दहशत आहे. या भागात मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. मात्र, बिबट्याच्या दहशतीने कोळपणी, खते टाकणे, आंतरमशागतीची कामे करण्यास मजूर धजावत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. शेतात वस्ती करून राहणाऱ्या शेतकऱ्यांनाही जनावरांची चिंता सतावू लागली आहे. वनविभागाने तातडीने बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी अरूण कापडणीस, प्रमोद कापडणीस, संदीप कापडणीस, महेंद्र कापडणीस, विनोद कापडणीस, हितेंद्र कापडणीस, आप्पा कापडणीस, भाऊसाहेब कापडणीस आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...