आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याचा वावर:कुंदेवाडीत बिबट्याचा संचार; ग्रामस्थांत भीती

सिन्नर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंदेवाडी येथे भरवस्तीत बिबट्याचा वावर होत असल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. दरम्यान, बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

मध्यरात्री रात्री एक वाजेच्या सुमारास संजय सखाहरी नाठे यांच्या घराजवळ बिबट्या दिसून आला. नाठे यांच्या शेडमध्ये बांधलेल्या शेळीवर त्याने हल्ला केला. शेजारी राहणारे सुरेश नाठे यांना शेळ्यांच्या आवाजाने जाग आली. घराबाहेर आल्यावर बिबट्या आल्याचे पाहिले. आरडाओरड करून त्यांनी बिबट्याला हुसकावून लावले. या रस्त्याने रात्रीच्या वेळी मुसळगाव औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार ये-जा करतात. बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...