आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समतेचा संदेश:एकोप्याने ईद साजरी करताना महाराष्ट्रातून समतेचा संदेश देऊ या; मंत्री छगन भुजबळ यांची नमाज पठणावेळी येवला ईदगाह मैदानावर उपस्थिती

येवलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ईदगाह मैदानावर आयोजित नमाज पठणावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली आणि मुस्लिम बांधवांना ईदनिमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी देशात आपल्याला शांतता राखायची असेल आणि समतेच्या मार्गाने जायचे असेल तर सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे. आपल्या मुलांना आणि मुलींना समान शिक्षण दिले पाहिजे. शिक्षण हा आपला अधिकार आहे, हे सांगतानाच त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत कार्य करणाऱ्या फातिमाबी शेख यांचीदेखील आठवण काढली.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे कायम शिक्षण, विकासासाठी आपल्यासोबत आहेत. काही मंडळी दोन समाजात तेढ निर्माण होईल असे भडकावू भाषण करत आहेत, मात्र त्याला बळी न पडता आपण विकासाच्या, रोजगाराच्या, आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या मुद्द्यावर ठाम रहायला हवे. त्यांनी तेढ निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी या देशाचे संविधान आपले रक्षण करेल, असे मत मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केले.

यावेळी आमदार नरेंद्र दराडे, जेष्ठ नेते माणिकराव शिंदे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अकबर शहा, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, भोलानाथ लोणारी, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, मंत्री भुजबळांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, शहराध्यक्ष दिपक लोणारी, समता परिषद जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे, गोटू मांजरे, शहर काजी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...