आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक पुरस्कार:लायन्स क्लबचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्या वतीने देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. ५ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता शहरातील सिन्नर महाविद्यालयात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

नाशिक येथील एम. एस. डब्ल्यू. कॉलेजचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांच्या हस्ते आदर्श शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे. प्राथमिक विभागात एस. जी. पब्लिक स्कूल प्राथमिक विभागाचे उदय चिंधू कुदळे, कोळगावमाळ जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शरद मधुकर शेरकर, माध्यमिक विभागात जनता विद्यालय सोनांबे येथील शिक्षक सुनील खैरनार, सरदवाडी येथील प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सुरेखा जेजूरकर तर उच्च माध्यमिक विभागात सिन्नर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुंडलिक रसाळ यांना आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित केला आहे.

सेवानिवृत्त शिक्षक भानुदास महादू भाबड यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष अपर्णा क्षत्रिय, सेक्रेटरी संगीता कटारे , अनिता नाईक, अर्चना चव्हाण, डॉ. सुजाता लोहारकर, डॉ. विजय लोहारकर, हेमंत वाजे, मनीष गुजराथी, मारुती कुलकर्णी, संजय सानप, सोपान परदेशी, भूषण क्षत्रिय आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...