आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्जपुरवठा करण्यात हात आखडता घेण्यात आल्याने, तसेच वसुली रखडल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या घोटेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक अविरोध करून येथील ग्रामस्थांनी आदर्श घालून दिला. १३ जागांसाठी झालेल्या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत छाननीनंतर चार जागा अविरोध झाल्या होत्या. सर्वसाधारण गटात ८ जागांसाठी १० तर इतर मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात होते.
सोसायटीसाठी सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत निवडणूक हितावह नाही ही बाब विचारात घेत सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घोटेकर, शंकर यादव यांनी मनाचा मोठेपणा दाखवत सोसायटीच्या निवडणुकीतून आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतल्यामुळे संस्थेची निवडणूक अविरोध पार पडली. अविरोध निवडणूक पार पाडण्याकामी सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान घोटेकर, माजी चेअरमन माणिक गडाख, दत्ताभाऊ ढमाले, प्रवीण घेगडमल, कैलास गुंजाळ, एकनाथ घोटेकर, सुखदेव वैराळ, भरत घोटेकर, बाबासाहेब घोटेकर, सुनील घोटेकर, नानासाहेब यादव, विलास यादव, गोरख बच्छाव, शिवाजी यादव, रंगनाथ तांबडे आदींनी मोलाची भूमिका बजावली. नवनिर्वाचित संचालक मंडळात सर्वसाधारण गटात सुखदेव लक्ष्मण वैराळ, नवनाथ बादशाह घोटेकर, योगेश मच्छिंद्र घोटेकर, भाऊसाहेब बापू सरोदे, नामदेव निवृत्ती घोटेकर, हौशीराम राधाकृष्ण ढमाले, आप्पासाहेब बाळकृष्ण यादव, विश्राम जयराम गडाख, इतर मागास प्रवर्गातून गणपत बाळाराम यादव, अनुसूचित जाती-जमाती गटातून पोपट तुळशीराम घेगडमल, भटक्या विमुक्त जमाती गटातून सुखदेव माधव कांदळकर, महिला राखीव गटातून मंगल सुभाष लोहोट, गंगूबाई निवृत्ती घोटेकर यांची अविरोध निवड झाली. नवनिर्वाचित संचालक मंडळाचे घोटेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच मंजूश्री भरत घोटेकर, उपसरपंच रंजना चंद्रभान घोटेकर आदींसह सदस्यांनी अभिनंदन केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वाघ यांनी काम पाहिले. त्यांना सचिव अनिल गिते, परशराम ढमाले यांनी सहाय्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.