आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सविस्तर प्रकल्प अहवाल:आडगावजवळील लाॅजिस्टिक पार्क येणार मुंबई महामार्गावर ; एमआयडीसीला चाचपणीचे आदेश

मालेगांव / भूषण महाले4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत-चेन्नई महामार्गालगत आडगावजवळ लाॅजिस्टिक पार्क उभारण्याचा प्रस्ताव जवळपास बासनात गेला असून उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी मुंबई महामार्गालगत समृद्धी व रेल्वेशी कनेक्टिव्हिटी तपासून दीडशे एकरवर लाॅजिस्टिक पार्क उभारण्याबाबत एमआयडीसीला चाचपणीचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. त्यानुसार एमआयडीसीने तीन महिन्यांत सविस्तर प्रकल्प अहवाल देण्याची तयारी सुरू केली असून प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी त्यास दुजाेरा दिला आहे.

केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गेल्यावर्षी एका कार्यक्रमात प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत शहरात अवजड वाहने शहरात येऊ देऊ नका असा सल्ला दिला हाेता. एवढेच नव्हे तर, शहराबाहेर लाॅजिस्टिक पार्क उभारून तेथे अवजड वाहने उभी करा व तेथून आवश्यक साहित्याची लहान वाहनाद्वारे ने-आण करा असेही सांगितले हाेते. त्यासाठी एक हजार काेटींचा शासनाकडून निधी देण्याचे आश्वासन दिले हाेते. तत्कालीन स्थायी समिती सभापती गणेश गिते व आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने आडगाव ट्रक टर्मिनल येथील जागेत लाॅजिस्टिक पार्क उभारण्याबाबत चाचपणी सुरू केली हाेती. तत्कालीन महापाैर सतीश कुलकर्णी यांनी कशात काहीच नसताना प्रकल्पाचे भूमिपूजन साेहळाही उरकून टाकला हाेता. मात्र, महापालिकेतील भाजपची सत्ता गेल्यानंतर हा प्रकल्प कागदावरच राहिला हाेता. अशातच दाेन दिवसांपूर्वी उद्याेगमंत्री सावंत यांच्याकडील बैठकीत लाॅजिस्टिक पार्क उभारण्याचा मुद्दा चर्चेत आला. त्यावर त्यांनी एमआयडीसी हा शासनाचा विभाग असल्यामुळे तीन महिन्यांत लाॅजिस्टिक पार्क काेठे उभारता येईल याबाबत व्यवहार्यता अहवाल देण्याबाबत सूचना करण्यात आला. त्यानुसार एमआयडीसीने आता महामार्गालगत विल्हाेळी ते इगतपुरी या दरम्यान काेठे जागा उपलब्ध हाेईल याची चाचपणी सुरू केली आहे.

शिंदे गटाचा भाजपला धक्का खासदार हेमंत गाेडसे यांच्या पुढाकारातून झालेल्या बैठकीत भाजपचा ड्रीम प्राेजेक्ट शिंदे गटाने पळवल्याचे उघड झाल्याने नाराजीचा सूर उमटला आहे. एमआयडीसी हे खाते शिंदे गटाकडे असून पालिकेऐवजी हे प्राधिकरण निवडल्यामुळे आपसूकच त्याचे श्रेयही भाजपला घेता येणार नाही. तसेच यापूर्वी ज्या जागेवर भूमिपूजनाचा नारळ फाेडला, त्यावरूनही भाजपची शाेभा हाेणार असल्याची चिंता व्यक्त हाेत आहे.

तीन महिन्यांत अहवाल एमआयडीसीकडे उद्याेगमंत्री उदय सामंत यांच्यासाेबतच्या बैठकीत लाॅजिस्टिक पार्कबाबत चाचपणी करण्याची जबाबदारी साेपवली आहे. तीन महिन्यांत अहवाल दिला जाईल. मुंबई महामार्गालगतच्या जागेचा विचार सुरू असून रेल्वे तसेच समृद्धीसाेबत कनेक्टिव्हिटीचा फायदा हाेऊ शकेल. - नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी

बातम्या आणखी आहेत...