आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मानित:लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी; लोकनेते पाटील बँक ‘बँको ब्ल्यू रिबन’ने सन्मानित

लासलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि. लासलगाव या बँकेला “बँको ब्ल्यू रिबन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.लोणावळा येथे भारतीय रिजर्व बँकेचे मुख्य जनरल मॅनेजर दत्तात्रय काळे यांच्या हस्ते बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार लोकनेते बँकेचे शंतनू पाटील, सुभाष रोटे व समीर आबड यांनी स्वीकारला. देशातील सर्व नागरी सहकारी बँकांमधील “ठेवी २०० कोटी ते २५० कोटी रुपये” या गटात बँकेला हा पुरस्कार मिळाला. संपूर्ण भारतातून ४५० पेक्षा जास्त सहकारी बँकांनी बँको पुरस्कारासाठी नामांकन सादर केले होते. सर्व नामांकनातून सार्वभौम प्रगती व उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या बँकांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

कोरोनाच्या कठीण कालखंडातही बँकेने उत्कृष्ट कामकाज केले असल्याची माहिती पुरस्काराच्या परीक्षकांनी दिली.हा राष्ट्रीयपातळीवरील पुरस्कार मिळण्याचे श्रेय सर्व संचालक, कर्मचारी, बँकेचे सभासद आणि बँकेवर विश्वास ठेवणारे सर्व ग्राहक यांना जाते, असे बँकेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी सांगितले. लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँकेला ५० वर्ष पूर्ण झाले आहे. बँकेच्या ठेवी २३५ कोटी रुपयांच्या असून बँकेने १२५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. तसेच बँकेने सुरक्षित १२२ कोटींची सरकारी रोखे व मुदत ठेवीत गुंतवणूक केलेली आहे. या पुरस्काराबद्दल अनेकांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...