आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:लक्झरी बसची ट्रॅक्टरला धडक; टरबूजांचे नुकसान

चांदवड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदवड शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल ग्रीन व्हॅलीसमोर ट्रॅक्टरसह दोन ट्रॉल्यांवर पाठीमागून लक्झरी बस धडकली. या अपघातात दोन्ही ट्रॉल्यांमध्ये भरलेल्या टरबुजांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले तर ट्रॅक्टरच्या दोन्ही ट्रॉल्या व लक्झरी बसचेही मोठे नुकसान झाले.

कुंभार्डे (ता. देवळा) येथील भूषण प्रकाश ठाकरे हे त्यांच्या ट्रॅक्टरला (एमएच ४१ एबी ०५७६) दोन ट्रॉल्या जोडून त्यात टरबूज भरून ते नाशिक येथील बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जात होते. सोमवारी (दि. ४) पहाटे ३ वाजेच्या सुमारास मालेगावकडून भरधाव आलेल्या लक्सरी बसने (एमपी १३ पी ४५०९) चांदवड शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गावरील देवीच्या माथ्याजवळील हॉटेल ग्रीन व्हॅलीसमोर ट्रॅक्टर व दोन्ही ट्रॉल्यांनी पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात टरबूजाचे नुकसान झाले. याबाबत भूषण ठाकरे यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी लक्झरी बसचालक आबिद बाबु खान (रा. पिपलकोटा, ता. कन्नोद जि. देवास, मध्य प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस नाईक दिनेश सुळ करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...