आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्व:महात्मा फुले कृषी विद्यापीठ; विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले मातीपरीक्षणाचे महत्त्व

निफाड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवपूर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न के. के. वाघ कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आगमन झाले. विद्यार्थी कौस्तुभ दोंड, हर्षद गाडेकर, आकाश देशमुख, रोहन पाटील, नारायण पाटील, रोहित धोंगडे, अभिषेक ढमाले यांनी गावातील सरपंच व प्रतिष्ठित व्यक्तींची भेट घेतली व आपल्या कामाबद्दल माहिती दिली व निवेदन देऊन आपल्या कामास सुरुवात केली.

विद्यार्थ्यांनी शेतकरी दीपक वाकचौरे यांच्या शेतात गावातील ग्रामस्थांना बोलवून मातीपरीक्षणाचे आयोजन केले, प्रात्यक्षिक करून दाखवले व मातीपरीक्षणाचे महत्त्व पटवून दिले त्यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीचे व प्रश्नांचे निवारण केले. प्रात्यक्षिकाबद्दल शेतकरी, ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...