आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:वादळी पावसाने मोठे नुकसान; मालेगावी वीज पडून पाच जनावरांचा मृत्यू

मालेगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात गुरुवारी झालेल्या वादळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. चार ठिकाणी वीज पडून पाच जनावरांचा मृत्यू झाला. तर राजमाने गावात झाड कोसळून एक बैल दगावला आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. महसूल विभागाने पंचमाने करून नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. तालुक्याच्या काही भागात गुरुवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाचा जोर व वादळी वाऱ्यात मोठी वित्तहानी झाली आहे.दहिदी, कौळाणे गा., खाकुर्डी व वडगावला वीज पडल्याने पाच जनावरांचा मृत्यू झाला.

यात तीन शेतीपयोगी बैल, एक पारडी व शेळीचा समावेश आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका शेतकरी सोनीबा बोरकर, रवींद्र बोळणीस, दीपक अहिरे व जानकाबाई अहिरे यांना बसला आहे. राजमाने येथे शेतकरी शिवाजी रसोडा यांच्या मालकीचा बैल झाड पडून मृत्यूमुखी पडला. उत्तम खैरनार (रा. कुकाणे), नाना वेताळ (साजवहाळ), संगीता ह्याळीज (वजीरखेडे) यांच्या घरांचे पत्रे उडून नुकसान झाले. डाबली येथील जिल्हा परिषद शाळा तसेच कंक्राळेच्या अंगणवाडीचे पत्रे उडाले आहेत. तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळांना भेटी देऊन पंचनाम्याच्या सूचना केल्या होत्या.त्यानुसार पाहणी करुन पंचनामे केले.

बातम्या आणखी आहेत...