आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दावा:मालेगाव, नांदगावला शिंदे गटाचे वर्चस्व

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल घाेषित झाला. चुरशीच्या व लक्षवेधी ठरलेल्या दाभाडीच्या थेट सरपंचपदी पालकमंत्री दादा भुसे समर्थक प्रमाेद निकम यांचा दणदणीत विजय झाला. पक्षांच्या दाव्यानुसार शिंदे गटाने निंबायती, साैंदाणे, दाभाडी, वजीरखेडे व पाटणे येथे बाजी मारली. तर भाजपला करंजगव्हाण, टाेकडे, माल्हनगाव व शिरसाेंडीत यश मिळाले. चाैकटपाडे, राेंझे, माेहपाडे व जाटपाडेत अपक्षांनी सत्ता हस्तगत केली आहे. निकाल जाहीर हाेताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी एकच जल्लाेष करत गुलाल उधळून घाेषणाबाजी केली.

माघारीनंतर थेट सरपंचपदासाठी ३३ तर सदस्यपदाचे २२६ उमेदवार रिंगणात हाेते. पहिल्या फेरीत राेंझे, शिरसाेंडी, माेहपाडे, चाैकटपाडे व निंबायती या पाच ग्रामपंचायतींचा निकाल घाेषित झाला. अंतिम तिसऱ्या फेरीत दाभाडीचा निकाल जाहीर झाला. दाभाडीत सरपंचपदासाठी ५ उमेदवार रिंगणात हाेते. यात प्रमाेद निकम व शशिकांत निकम हे दाेघे शिंदे गटाचे समर्थक एकमेकांसमाेर ठाकले हाेते. या लढतीत प्रमाेद निकम यांनी ५००२ मते मिळवून शशिकांत निकम यांचा पराभव केला. निकम यांना ३५४५ मते मिळाली.

प्रारंभी प्रतिष्ठेची वाटणारी साैंदाणेच्या थेट सरपंचपदाची निवडणूक निकालानंतर एकतर्फी झाल्याचे दिसून आले. शितल चेतन पवार यांनी ३३०८ मतांनी विजय प्राप्त केला. प्रतिस्पर्धी उमेदवार दगूबाई ज्ञानदेव पवार यांना अवघी ४४६ मते मिळाली. इतर ठिकाणीही धक्कादायक निकाल लागले आहेत. मातब्बरांना धाेबीपछाड देत तरुणांनी बाजी मारली आहे.

जाटपाडेत काका व पुतण्याची लढत चर्चेची ठरली हाेती. काका भागचंद तेजा यांनी पुतण्या ज्ञानेश्वर तेजा याला पराभूत केले. निवडणूक प्रक्रिया तहसीलदार कैलास पवार, नायब तहसीलदार रमेश खैरे, संदीप धारणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली गेली.

मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतनिहाय विजयी उमेदवार
दाभाडी : सरपंच - प्रमाेद निकम (५००२), सदस्य - प्रकाश अहिरे (७३३), उषा महिरे (७३०), शाेभा निकम (७६९), बळीराम माळी (१०६८), सुभाष नहिरे (१०८०), दीपाली मानकर (९६७), हरिदादा निकम (८०३), माेनाली वाघ (८३७), वृषाली निकम (९८३), कुमुदिनी निकम (९५०), गब्बर निकम (८६१), देवचंद गाेरे (८०१), नंदकुमार निकम (७३२), ममता गिरासे (७००), प्रभाकर ठाकरे (४५३), पूजा गांगुर्डे (५७२), पूनम भावसार (४६६). साैंदाणे : सरपंच - शीतल चेतन पवार (३३०६), सदस्य - तात्यासाहेब बळीराम पवार (३५२), रंजना सर्जेराव पवार (४९३) इतर १५ सदस्य अविराेध. माल्हनगाव : सरपंच - बाबाजी सूर्यवंशी (५४०)

इतर ७ सदस्य
अविराेध. करंजगव्हाण : थेट सरपंच - कविता राजेंद्र साेनवणे (१७३५), सदस्य - जाकीर गफ्फार मन्सुरी (३७५), सुवर्णा शेवाळे (३५८), गणेश जाधव (३४०), नंदकिशाेर मालपुरे (२५९), चित्रा खैरनार (२५०), ७ जागा अविराेध. पाटणे : सरपंच - संगीता यशाेद (१९३२), धर्मा साेनवणे (४६१), गाैरव अहिरे (५०१), मीनाबाई त्रिभुवन (४२८), रवींद्र निकम (६३४), कांतिलाल नहार (४२६), याेगिता खैरनार (६४९), दत्तात्रय खैरनार (५१५), ज्याेती खैरनार (४१७), रूपाली खैरनार (४२९), कविता पवार (४२८), सीता पगारे (३६३), तुकाराम बागूल (३९३), प्रमिला साेनवणे (३७३), संगीता जाधव (४५१). वजीरखेडे : सरपंच - सुनीता बाेरसे (१२०४), सदस्य - शीतल महाले (३२९), संदीप भदाणे (३३६), निंबाबाई गायकवाड (३३५), बाबाजी साेनवणे (३१६), विठाबाई गांगुर्डे (३८६), मंलाबाई पवार (३१८), विनाेद बाेरसे (३५२), मनीषा ह्याळीज (३३२), गंगूबाई अहिरे (२७२), दिलीप निकम (२८३), वैशाली पाटील (२५२). टाेकडे : सरपंच - कैलास दाभाडे (८५६), सदस्य - भाऊसिंग डिंगर (३६७), बेबीबाई चव्हाण (३८०), चिंधाबाई दराखा (४२०), जयश्री उशिरे (३५२), दीपाली वाघ (३२१), सुनीता चितळ (३३६), वसंत ठाकरे (३३०), प्रेमाबाई कव्हड (३१५), कल्पनाबाई शेजवळ (२८१). जाटपाडे : सरपंच - भागचंद तेजा (७३७), सदस्य - दगा पवार (२५३), शैला वाघ (२५४), निंबा जगताप (२५४), रामचंद्र माेकळ (२९२), प्रभाकर साेनवणे (२६७), अरुणा मान (३२०), मन्साराम बिसू (२०२), सुमनबाई साेनवणे (१९०), राधाबाई बिसू (२१४). राेंझे : सदस्य – नामदेव उगले (२४९), सुनंदा उगले (२२१), अहिल्याबाई सांगले (८४), थेट सरपंच व चार सदस्य अविराेध. शिरसाेंडी : सरपंच - साेनाली बाेरसे (७०८), सदस्य – संजय पवार (२९३), मयुरी पवार (२६४), चार सदस्य अविराेध तर एक जागा रिक्त. माेहपाडे : सरपंच - भगवान बाेरकर (२५७), सदस्य - लताबाई बाेरकर (१२५), बिबाबाई डाेमाळे (१०५), रतन बाेरकर (९९), हिरामण आयनाेर (७५), सायजाबाई बाेरकर (९०), सीताराम बाेरकर (७९), विमलबाई बाेरकर (६६). चाैकटपाडे : थेट सरपंच - निर्मला पवार (२९२), समाधान पारखे (१०८), संगीता जाधव (१२१), अरुणा शेवाळे (११५), शैलेश गायकवाड (१२१), प्रिती लाेखंडे (११५), देवीदास लाेखंडे (१२८), अलका सराेदे (१२३). निंबायती : सरपंच - ताईबाई माळी (१३२४), गाेरखनाथ माळी (३२१), हिरुबाई पवार (३११), जयश्री शेवाळे (३३०), मन्साराम शेवाळे (४११), लहानुबाई जगताप (३३२), शाेभा शेवाळे (३४६), नानाजी शेवाळे (२०९), वैशाली शेवाळे (४०१), चिंतामण शेवाळे (३४८), स्वप्नील तुळशीराम (३४०), आशाबाई शेवाळे (३६५).

बातम्या आणखी आहेत...