आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषी विभागाच्या मालेगाव, सटाणा, नांदगाव या उपविभागात केंद्र सरकारची प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना राबविण्यात येत आहे. तसेच या ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ या संकल्पनेंतर्गत पीकसंबंधी क्षेत्रात नवा उद्योग सुरु करण्याचे बंधन शिथील करण्यात आले आहेत.याचा नवउद्योजक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप देवरे यांनी केले आहे.
‘एक जिल्हा एक उत्पादन’ या संकल्पनेनुसार नाशिक जिल्ह्याला कांदा एक उत्पादन ठरवून दिलले होते. कांदा पीकसंबंधी क्षेत्रातच नवा उद्योग सुरु करण्याचे बंधन शिथील करण्यात आले असून शिक्षणाची अटही शिथील करण्यात आली आहे. या योजनेत वैयक्तिक महिला, पुरुष, नागरी, ग्रामीण युवक, युवती, शेतकरी, महिला उद्योजक,कारागीर, बेरोजगार, बचत गट, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आदी कोणीही सहभागी होऊन नवीन उद्योग सुरु करु शकणार आहेत.
त्याचप्रमाणे नवीन व जुन्या सर्व प्रकारचे प्रक्रिया उद्योग जसे दूध प्रक्रिया, पापड, मसाले, शेवया, कुरडया, लोणचे, चिप्स, कुरकुरे, दालमिल, ऑईल, मिल, केक, कुकीज, बेकरी प्रोडक्टस अशा प्रकारचे सर्व प्रक्रिया उद्योगांना लाभ देण्यात येणार असल्याची माहितीही देवरे यांनी दिली आहे.यासाठी इच्छुकांनी जिल्हा संसाधन व्यक्तीमार्फत अर्ज सादर करावा. या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छूकांनी जिल्हा संसाधन प्रतिनिधी किंवा तालुका कृषि अधिकारी मालेगाव, सटाणा, नांदगाव कार्यालयाशी अथवा माहितीसाठी कृषी विभागाच्या कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
३५ % अनुदान देय
सदर योजनेमध्ये वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग बॅक कर्जाशी निगडीत असून एकूण पात्र प्रकल्पाच्या ३५ टक्के व जास्तीत जास्त १० लाखापर्यंत अनुदान देय आहे. राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक यापैकी कोणतीही बँक कर्ज देवू शकते. लाभार्थीचा अर्थिक सहभाग कमीतकमी १० टक्के असावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.