आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंपूर्णता:मालेगावकरांचे 1100 दलघफू आरक्षण शिल्लक, ऑगस्टपर्यंत मुबलक पाणी

मालेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 50 जलकुंभ, 575 झोन, 500 किमी जलवाहिन्यांद्वारा शहराला पाणीपुरवठा

जिल्हाभरात अनेक ठिकाणी पाणीटंचाई सुरू झाली असून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, मालेगावकरांना ऑगस्ट २०२२ पर्यंत मुबलक पाण्याचा पुरवठा करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. पालिकेचा गिरणा व चणकापूरमध्ये अद्याप ११०० दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. शहरात ५० जलकुंभ, ५७५ झोन व ८०० किमी जलवाहिन्यांद्वारा होणाऱ्या पाणीपुरवठ्याने ७ लाख लोकसंख्या पुढील तीन महिने टंचाईमुक्त आहे.

मालेगाव शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. यासाठी चणकापूर धरणात १४०० व गिरणा धरणात ९०० दलघफू इतके पाणी आरक्षण करण्यात आले आहे. चणकापूर धरणातून चार आवर्तनांद्वारे हे पाणी घेण्याचा करार आहे तर गिरणा धरणातून वीजपंपद्वारा पाणी पंपिंग केले जाते. पालिकेने चणकापूरमधून दोन आवर्तने घेतली असून यातील ७० दलघफू पाणी तळवाडे साठवण तलावात शिल्लक आहे. गिरणा धरणातून ४२५ दलघफू पाणी उचल झाली आहे. आता सुमारे ५०० दलघफू इतके पालिकेचे पाणी आरक्षण शिल्लक आहे. चणकापूरमध्ये दोन आवर्तने अर्थात ७०० दलघफू पाणी आरक्षण शिल्लक आहे.

मात्र, या आरक्षण करारानुसार पालिकेला फक्त तळवाडे साठवण तलाव दोन वेळा भरून दिला जाईल, अर्थात तलावात या दोन आवर्तनांतून १७० दलघफू साठा होणार आहे. शहराला पाणीपुरवठ्यासाठी एटीटी हायस्कूलजवळील जलशुद्धीकरण केंद्र व सायने जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी घेतले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असला तरी कुठेही टंचाई नाही.

बातम्या आणखी आहेत...