आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील १२ नाेव्हेंबर दंगल प्रकरणात गेल्या एक वर्षांपासून फरार असलेल्या दाेघा संशयितांना विशेष पथकाने अटक केली. अमान सिराज बेग उर्फ अब्बू व अक्रम आरिफ शेख उर्फ अज्जू लस्सणवाला अशी संशयितांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने अज्जू लस्सणवालाचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला हाेता. शहरात त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ १२ नाेव्हेंबर २०२१ राेजी बंद पुकारण्यात आला हाेता. या बंदला हिंसक वळण लागून दगडफेक व ताेडफाेडीचा प्रकार घडला हाेता. याप्रकरणी शहर व आयशानगर पाेलिस ठाण्यांमध्ये तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले हाेते. यातील काही संशयित घटनेच्या एक वर्षानंतरही फरार आहेत. अपर पाेलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या निर्देशानुसार विशेष पथकाने शाेध माेहीम राबवून अमान बेग याला कालीकुट्टी परिसरातून ताब्यात घेतले. तर अज्जू लस्सणवाला सुपर मार्केटजवळ चहा पित असल्याची माहिती मिळताच उपनिरीक्षक शैलेश पाटील, कर्मचारी इम्रान सय्यद व दिनेश शेरावते यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. बेग याला आयशानगर तर अज्जू याला शहर पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दाेघांचे जामीन अर्ज स्थानिक न्यायालयाने फेटाळले दंगलीतील दाेघा संशयितांचे अटकपूर्व अर्ज स्थानिक न्यायालयाने फेटाळून लावले. संशयित कारी हारुन रिझवी व अकील अहमद रिझवी यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले हाेते. मागील महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने इब्राहिम रईस शेख, अक्रम आसिफ शेख, फारुख अहमद शेख, ताैसिफ मुसा शेख, नवीद अब्दूल रज्जाक शेख यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.