आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव दंगल:मालेगाव दंगल; संशयित युसूफ इलियासला अटकपूर्व जामीन ; पाच जणांचा जामीन अर्ज फेटाळला

मालेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात घडलेल्या दंगलीतील संशयित सुन्नी कौन्सिलचे अध्यक्ष युसूफ इलियास यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. अक्रम शेख ऊर्फ अज्जू लस्सणवाला यांच्यासह पाच जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला गेला. या संशयितांना पोलिसांसमोर शरणागती पत्कारणे किंवा सर्वाच्च न्यायालयात धाव घेण्याचा पर्याय उरला आहे.

त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ शहरात १२ नोव्हेंबर २०२१ ला बंद पुकारण्यात आला होता. सुन्नी जमियत उलमा व रजा अकॅडमीने या बंदची हाक दिली होती. बंदला अचानक हिंसक वळण लागून दगडफेड, तोडफोड व जाळपोळीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी युसूफ इलियास यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. घटना घडल्यापासून इलियास फरार होते. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायाधीश एन. जे. जमादार यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने अटी व शर्तींच्या अधीन राहून इलियास यांचा जामीन मंजूर केला. अक्रम शेख, इब्राहिम शेख, फारुख शेख, तोसिफ शेख व नवीद शेख यांचा अर्ज फेटाळण्यात आला. आत्तापर्यंत सात जणांचा अटकपूर्व मंजूर झाला आहे. यात इलियास यांचा डॉक्टरपुत्र व नगरसेवक पुतण्याचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...