आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:मालेगावचा पाणीपुरवठा गुरुवारी विस्कळीत; गिरणा धरण परिसर

मालेगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गिरणा धरण परिसरात वादळी पाऊस झाल्यामुळे महापालिकेच्या गिरणा धरण वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या धरण क्षेत्रातील उद्भववरील पाणी पंपिंग बंद पडले आहे. त्यामुळे गुरुवारी शहरात पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

वीज कंपनीच्या दहिवाळ सबस्टेशनवरून एक्स्प्रेस विद्युत वाहिनीद्वारे गिरणा पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा केला जातो. येथील वीजपुरवठा बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता खंडित झाल्याने गिरणा उद्भववरील पंपिंग बंद झाले आहे. परिणामी येथून पुढचा नियोजित पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गिरणा पंपिंग सुरळीतपणे सुरू झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्याबाबतचे नियोजन करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...