आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:मालेगावच्या अन्सारबाग घरफोडी, चौघांना अटक

मालेगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अन्सार कॉलनीतील सात लाखांच्या घरफोडीप्रकरणी फरार असलेल्या चौघांना आयेशानगर पोलिसांनी संभाजीनगर (औरंगाबाद) येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन लाख ७९ हजार ७८३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. २८ जून २०२२ रोजी अन्सार कॉलनीतील मोहम्मद शफी शेख बिसमिल्ला यांच्या घरात ७ लाख ३५ हजार ३९ रुपयांची घरफोडी झाली होती. याप्रकरणी आयशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील संशयितांचा पोलिस शोध घेत होती.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संभाजीनगर तसेच मालेगाव येथे कारवाई करीत संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये अन्सारी अनिस अहमद हबिबुल्लाह (३२, रा. हाजी शफी पार्क, मालेगाव), मुद्दसीर जमील अहमद (२७, रा. नूरबाग), आसिफ अन्जुम राशिद अहमद (२७, रा. हुडको कॉलनी), शेख रफिक शेख पाशा (३८, रा. रहिमनगर, संभाजीनगर यांचा समावेश आहे. पोलिसांनी या टोळीकडून दागिने, चोरीचा मुद्देमाल, घड्याळ, दुचाकी असा एकूण तीन लाख ७९ हजार ७८३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील, सुभाष चोपडा, शरद मोगल, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...