आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामालेगावातील केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारीची विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली. तात्काळ जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांच्याशी संपर्क साधून त्यांना याेग्य कार्यवाहीचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी पुरवठा अधिकारी व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी व्हिडिओ न्फरन्सद्वारे संवाद साधत सर्व तक्रारी व मागण्या समजून घेतल्या.
माजी आमदार रशीद शेख व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आसिफ शेख यांनी बुधवारी विधान भवनात पवार यांची भेट घेतली. त्यांच्यासमाेर शासकीय धान्य वितरण व्यवस्थेच्या अडचणी मांडल्या. शहरात एक लाख १९ हजार केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळत नाही. या मागणीसाठी साेमवारी माेर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिल्याची माहिती आसिफ शेख यांनी दिली. पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला.
मालेगावशी निगडीत धान्य वितरणाच्या सर्व समस्या लागलीच साेडविण्याच्या सूचना केल्या. यानंतर जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांनी माजी महापाैर ताहेरा शेख, माजी नगरसेवक शकील जानी बेग, अस्लम अन्सारी यांच्यासह पुरवठा अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. येत्या काही दिवसांत धान्य वितरणाच्या अडचणी दूर हाेतील, असे आश्वासन दिले.
जिल्हाधिकाऱ्यांना इशारा
ऑनलाइन बैठकीत माजी महापाैर ताहेरा शेख यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांवर आराेप केले. पुरवठा अधिकारी कधीही मालेगावी भेट देत नाही. आश्वासनानुसार प्रश्न मार्गी लागणे अपेक्षित आहे. जर समस्या सुटल्या नाहीत तर २६ डिसेंबरला आपल्या कार्यालयात घेराव घालू, असा इशाराच माजी आमदार शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.