आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियाेजन:मालेगावी १३ गणेशकुंड ; निर्माल्यासाठी वाहने

मालेगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रारंभी तीन गणेशकुंडांवर गणरायाच्या विसर्जनाचे नियाेजन करणाऱ्या मनपाने ११ तात्पुरत्या कृत्रिम कुंडांची उभारणी केली आहे. शहरात शुक्रवारी सकाळी सात वाजेपासून १३ गणेशकुंडांवर भाविकांना विधिवत श्रींचे विसर्जन करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन विभागाने २९ जीव रक्षकांची नियुक्ती केली असून सर्व कुंडांच्या परिसरात तब्बल ५० पाेलिस कर्मचारी तैनात राहणार आहे. मूर्ती दानसह निर्माल्य संकलनासाठी विसर्जनस्थळांवर वाहनांची व्यवस्था पूर्ण झाली आहे.

महादेव घाट गणेशकुंड (संगमेश्वर सार्वजनिक श्री गणेश मंडळे, गावठाणातील पूर्व भाग), वाल्मीकनगर शाळा (संगमेश्वर गावठाणातील घरगुती श्रीगणेश मूर्ती), टेहरे चाैफुली गिरणा नदीपात्र (साेयगाव गावठाण घरगुती व सार्वजनिक श्री मूर्ती, अयाेध्यानगर, स्वप्नपूर्तीनगर), साेयगाव फायर स्टेशन (साेयगाव नववसाहत व लगतचा परिसर), अंबिका काॅलनी (अंबिका मंदिर, कॅम्प चर्च ते डी. के. काॅर्नर पश्चिमेकडील भाग), संभाजी नगर नामपूरराेड (शिवनेरी बंगल्यासमाेर चर्चगेट ते भाेसले पेट्राेलपंप, नामपूरराेडचा पूर्व व पश्चिम भाग), भायगाव पुष्पाताई हिरेनगर (गणपती मंदिर, भायगाव नववसाहत व परिसर), कलेक्टरपट्टा (सर्व्हे नंबर २६५ महारुद्र हनुमान परिसर, कलेक्टरपट्टा व परिसर), शिवाजी महाराज जिमखाना (श्रीरामनगर, शिवाजीनगर, बारा बंगला व लगतचा परिसर), कॅम्प गणेशकुंड (हिंमतनगर, साने गुरुजी नगर, सिंधी काॅलनी, कॅम्प गावठाण, माेची काॅर्नरपर्यंतचा परिसर.)

बातम्या आणखी आहेत...