आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियाेजन:मालेगावी आजपासून 28 रस्ते दाेन दिवस वाहतुकीसाठी बंद; गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पर्यायी मार्गांनी वाहतूक वळविली

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती मंडळांचे आरस प्रदर्शन व विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील २८ रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहे. गुरुवार व शुक्रवार या दाेन दिवशी रस्ते बंद ठेवण्याचे नियाेजन करण्यात आले आहे. टेहरे चाैफुलीहून शहरात येणारा मार्ग व कुसुंबाराेड मार्गावरील वाहतूक विसर्जनाच्या दिवशी पूर्णपणे बंद ठेवून पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार असल्याची माहिती अपर पाेलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी दिली आहे.

शहरात गणेशाेत्सवाच्या अखेरीस आरास, देखाव्यांची परंपरा आहे. काेविड निर्बंधांमुळे दाेन वर्षे ही परंपरा खंडित झाली हाेती. यंदा अनेक मंडळांनी आरास प्रदर्शनाचे नियाेजन केले आहे. गुरुवारी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत आरास प्रदर्शन सुरु रहाणार आहे. देखावे बघण्यासाठी नागरिकांची माेठी गर्दी हाेत असते. शुक्रवारी गणपती विसर्जन हाेणार आहे. या दाेन दिवसात हाेणारी गर्दी लक्षात घेऊन पाेलिसांनी वाहतुकीचे नियाेजन केले आहे. कॅम्प गणेशकुंड, सटाणानाका, गवळीवाडा ते महादेव घाट गणेशकुंडदरम्यानचे २८ रस्ते बॅरिकेडिंगद्वारे बंद ठेवले जाणार आहेत. गुरुवार ते शुक्रवार या दाेन्ही दिवशी सदर रस्ते रात्री १२ वाजेपर्यंत बंद रहातील. पर्यायी मार्गांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक शाखेचे दाेन अधिकारी व ४१ कर्मचारी नियुक्त केले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांची वापर करावा. बंद रस्त्यांच्या परिसरात आपली वाहने नेऊ नये, असे आवाहन शहर वाहतूक पाेलिस शाखेचे उपनिरीक्षक यू. बी. माेहारे यांनी केले आहे.

हे रस्ते राहणार खुले
वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे. माेसम पूल, अल्लाम्मा इकबाल पूल, माेतीबाग नाका, नवीन बसस्थानक, शिवाजी महाराज पुतळा मार्गाची वाहतूक नियमितपणे सुरु राहिल. नागरिकांनी या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे रस्ते राहणार बंद
संगमेश्वर लाेकमान्य विद्यालय रस्ता, रामसेतू पूल, डाॅ. आंबेडकर पूल, सांडवा पूल, शनीमंदिर राेड, पेरी चाैक, सरदार चाैक, शास्त्री चाैक, नेहरु चाैक, मामलेदार गल्ली, पाच कंदिल, पाेफळे राममंदिर, टिळक चाैक, टिळक राेड, शिवशक्ती चाैक, जुनी मनपा इमारत राेड हे रस्ते बंद राहतील.

बातम्या आणखी आहेत...