आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात गाेवंश जनावरांमध्ये लम्पी या संसर्गजन्य आजाराचा वेगाने प्रसार हाेत आहे. नाशिक जिल्हा बाधित क्षेत्र म्हणून घाेषित झाला आहे. लम्पीचा संसर्ग राेखण्यासाठी खरबदारी म्हणून शुक्रवारचा (दि. १६) गुरांचा भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, आजमितीस मालेगाव तालुका लम्पीमुक्त असून शंभर टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
राज्यभरात लम्पीबाधित जनावरांची संख्या वाढत आहे. जिल्ह्याच्या काही भागातही बाधित जनावरे आढळून येत आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने त्याचा झपाट्याने प्रसार हाेताे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पुढील आदेश प्राप्त झाल्यानंतर बाजार केव्हा सुरू हाेईल याची माहिती शेतकरी व व्यापाऱ्यांना दिली जाणार आहे. प्रादेशिक पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त बी. आर. नरवडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व्ही. डी. गर्जे, सहायक आयुक्त पी. एफ. गायकवाड यांच्या मार्गदर्शनासाठी पशुधन विकास अधिकारी डाॅ. जावेद खाटीक व पंचायत समितीच्या डाॅ. मयुरा अरबट हे जनावरांच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाचे काम करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.