आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:मालेगावी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

मालेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व तालुक्यातील हाेतकरू तसेच गरीब विद्यार्थ्यांसाठी माेफत तीन दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयाेजित करण्यात आली आहे. कॅम्पातील बालगंधर्व मंगल कार्यालयात १६ ते १८ डिसेंबरदरम्यान हाेणाऱ्या कार्यशाळेस तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार असून गरजू विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाराबलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंडूकाका बच्छाव यांनी केले.

शासकीय विश्रामगृहावर बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत बच्छाव यांनी कार्यशाळेची माहिती दिली. अमृतमहाेत्सवी वर्षपूर्तीनिमित्ताने पाेलिस, महसूल, वन, आराेग्य, कृषी आदी विभागांमध्ये ७५ हजार पदांची भरती केली जात आहे. नाेकरीच्या शाेधात असलेल्या तरुणांना ही माेठी संधी उपलब्ध झाली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याेग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने १६, १७ व १८ डिसेंबरला तीन दिवसांची कार्यशाळा आयाेजित केल्याचे बच्छाव यांनी सांगितले. प्रा. सचिन ढवळे, प्रा. राजेश भराटे, प्रा. आशालता गुट्टे व प्रा. निवृत्ती काेते यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.

पहिले दाेन दिवस सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कार्यशाळा हाेईल. तर शेवटच्या दिवशी प्रा. ढवळे हे सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेतच ५० व १०० गुणांचे संभाव्य पेपर घेतले जातील. यात पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण हाेणाऱ्या विद्यार्थ्यांचा गाैरव केला जाणार आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवास व जेवणाची व्यवस्था केली जाणार असल्याचे बच्छाव यांनी सांगितले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पवार, दिलीप आहिरे, सुरेश शेलार, पिंटू अहिरे, निसार शेख उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...