आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वजाराेहण करत मानवंदना:मालेगावी संविधान वाचन ; रक्तदान शिबिर

मालेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर परिसरात स्वातंत्र्य दिनाचा अभूतपूर्व जल्लाेष दिसून आला. तिरंगा रॅली, दुचाकी रॅली, रक्तदान शिबिरे, संविधान वाचन अशा विविध उपक्रमांमधून स्वातंत्र्य दिनाचा आनंदाेत्सव द्विगुणित करण्यात आला. पाेलिस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजाराेहण अपर जिल्हाधिकारी माया पाटाेळे यांच्या हस्ते झाले. तहसील कार्यालयात प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, पाेलिस नियंत्रण कक्षात अपर पाेलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी ध्वजाराेहण करत मानवंदना दिली.

शासकीय, शैक्षणिक,सामाजिक व राजकीय कार्यालयांमध्ये ध्वजाराेहण झाले. आमदार मुफ्ती माेहंमद इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या प्रमुख मार्गांवरून तिरंगा रॅली काढण्यात आली. माजी आमदार आसिफ शेख यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ७५ किलाेचा केक कापून नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. फ्रीडम फायटर इन्साफ कमिटीचे प्रमुख मुस्तकिम डिग्नीटी यांनी किदवाई राेडवरील अशाेक स्तंभाजवळ सार्वजनिकरीत्या संविधान वाचन केले. पाेलिस दक्षता पीपल्स असाेसिएशनने रक्तदान शिबिर आयाेजित करून कॅम्प पाेलिस ठाण्याला ७५ वृक्षांची भेट दिली. वन कार्यालयात उपविभागीय वन अधिकारी जगदीश येडलावार, वन परिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांनी ध्वजाराेहण करत विविध वृक्षांची लागवड केली.

बातम्या आणखी आहेत...