आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाेषणाबाजी:मालेगावी जाेडे माराे आंदाेलन ; भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांचा इशारा

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षातर्फे मंगळवारी सकाळी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमाेर पवार व आव्हाड यांच्या फलकांना जाेडे मारून आंदाेलन करत जाेरदार घाेषणाबाजी करण्यात आली. पवारांनी माफी मागून आपले वक्तव्य मागे घ्यावे, अन्यथा भविष्यात आंदाेलन तीव्र करण्याचा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांनी दिला.

भाजपने माेसम पूल चाैकात निदर्शने केली. पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागून विधान मागे घ्यावे, असे निकम यांनी सांगितले. एका समाजाला खुश करण्यासाठी व तेढ निर्माण करण्याच्या हेतूने वादग्रस्त विधाने केली जात असल्याचा आराेप माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी केला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते हरिप्रसाद गुप्ता, भरत पोफळे, देवा पाटील, मदन गायकवाड, अरुण पाटील, सुनील शेलार, नंदूतात्या साेयगावकर, नेविलकुमार तिवारी, साेमन्ना गवळी, करण भाेसले, महेश वाघ, स्वप्नील भदाणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...