आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील अतिक्रमणांवर महापालिकेने १७ जूनपासून धडक कारवाई सुरू केली आहे. बकरी ईदमुळे थांबविलेली मोहीम साेमवारी पुन्हा हाती घेत अब्दुल्लानगर भागातील ५८ अतिक्रमणे निष्कासित केली.
सकाळी प्रभाग क्रमांक ३ मधील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. पथकाने या भागातील ५८ अतिक्रमणे हटविली. अतिक्रमणे उद्ध्वस्त करत रस्ते, गटारी माेकळ्या केल्या. रस्त्यांच्या कडेला हातगाड्या लावून केलेले अतिक्रमण हटवत साहित्य जप्त करण्यात आले. पथक पाेहाेचताच काही नागरिकांनी रस्त्यांच्या कडेला केलेले अतिक्रमण स्वत: काढून रस्ता माेकळा करून दिला.
मागील ३१ दिवसांत हजाराे अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. नागरिकांनी रस्ता, नाला, गटारी, माेकळे भूखंड यावर केलेले अतिक्रमण काढून घ्यावे. तंबी देऊनही अतिक्रमण न हटविल्यास अतिक्रमित साहित्य जप्त केले जाईल. पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासक भालचंद्र गाेसावी यांनी दिला आहे. अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त सतीश दिघे, सहायक आयुक्त सुनील खडके यांच्या मार्गदर्शनखाली प्रभाग अधिकारी हरिष डिंबर, अतिक्रमण अधीक्षक श्याम कांबळे, शेखर वैद्य, मनोहर धिवरे, अजय चांगरे, संजय जगताप आदींनी माेहीम राबविली
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.