आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:मालेगावी राज्यपालांच्या प्रतिमेला जाेडे मारत निषेध

मालेगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिमा जाळून जोरदार निदर्शने केली.रविवारी दुपारी कार्यकर्ते मोसम पूल भागातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर एकत्र जमले होते. कार्यकर्त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारले. यानंतर प्रतिमा जाळून निषेध व्यक्त केला.

सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोश्यारी यांना हटविण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात रामभाऊ मिस्तरी, प्रमोद शुक्ला, नथू जगताप, जितेंद्र देसले, प्रेम माळी, मनोज जगताप, विलास बिरारी, नरेंद्र वसईकर, श्याम गवळी, कैलास तिसगे, विजय गवळी यांच्यासह शिवसैनिक व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...