आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदभार स्वीकारला:मानूर सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी माणिक पवार

कळवण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पदभार स्वीकारला : उपाध्यक्षपदी सविता बोरसे यांची अविरोध निवड

मानूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी माणिक नानाजी पवार व उपाध्यक्षपदी सविता व्यंकट बोरसे यांची अविरोध निवड झाली. यामुळे सोसायटीची अविरोध अध्यक्ष निवडीची परंपरा कायम राहिली.गत महिन्यात झालेल्या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत उत्कर्ष पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकून सत्ता कायम ठेवली होती. त्यामुळे अध्यक्ष निवड ही अविरोध होईल अशीच शक्यता होती.

गुरुवारी (दि. १२) दुपारी १२ वाजता सोसायटी कार्यालयात अध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा झाली. यावेळी सहायक निबंधक के. डी. गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज केले. निवडणूक प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी माणिक नानाजी पवार व उपाध्यक्षपदासाठी सविता व्यंकट बोरसे यांचेच मुदतीत अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. यावेळी सोसायटीचे माजी अध्यक्ष जयवंत पवार यांनी त्यांच्याकडे पदभार दिला.

यावेळी उपसरपंच रवींद्र बोरसे, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र पवार, हेमंत बोरसे, जयवंत बोरसे, अशोक पवार आदींसह संचालिका लताबाई पवार, संचालक विश्वनाथ पवार, सोमनाथ पवार, केदा जाधव, बाळासाहेब पवार, हिरामण पवार, अमोल पवार, प्रकाश बोरसे, अभिजित पवार, उत्तम पवार, हरिष पाटोळे, सचिव राजेंद्र पगार, सहसचिव‌ नामदेव पवार, बाळासाहेब बोरसे, नीलेश पवार, मुकुंद पवार, नितीन पवार, राजेंद्र पवार आदींसह नागरिक व सभासद उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...