आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:निफाड काॅलेजचा मंजितकुमार‎ राज्यात प्रथम तर शिंदे द्वितीय‎

निफाड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय‎ पुणे, महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा‎ अधिकारी कार्यालय व जिल्हा‎ परिषद पुणे, आयोजित राज्यस्तरीय‎ शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा‎ शिवछत्रपती क्रीडा संकुल‎ बालेवाडी, पुणे येथे पार पडल्या.‎ यात निफाड कर्मवीर गणपत दादा‎ मोरे कला, वाणिज्य व विज्ञान‎ महाविद्यालयातील खेळाडूंनी‎ चमकदार कामगिरी केली. १९ वर्षे‎ आतील खेळाडू मंजितकुमार‎ रामेश्वर महतो याने गोळा फेक‎ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.‎ त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची‎ निवड झाली अाहे.‎ भूषण शामराव शिंदे याने लांब उडी‎ व तिहेरी उडी या स्पर्धेत द्वितीय‎ क्रमांक घेऊन राष्ट्रीय स्पर्धेसाठी‎ निवड झाली.

अविनाश शिवाजी‎ शिंदे यांनी तिहेरी उडीत उत्तेजनार्थ‎ पारितोषिक मिळवळे.‎ कर्मवीर गणपत दादा मोरे‎ महाविद्यालयाच्या खेळाडूंची राष्ट्रीय‎ मैदानी स्पर्धेसाठी निवड‎ झाल्याबद्दल सभापती बाळासाहेब‎ क्षीरसागर यांनी खेळाडूंना शुभेच्छा‎ दिल्या. खेळाडंूचे मविप्र संस्थेचे‎ अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले,‎ उपाध्यक्ष विश्वासराव मोरे,‎ उपसभापती देवराम मोगल,‎ सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे,‎ चिटणीस दिलीप दळवी, संचालक‎ शिवाजी गडाख, प्राचार्य डॉ. ए. के.‎ शिंदे, उपप्राचार्य प्रा. ए. एल.‎ गायकवाड, चेतन कुंदे अादींकडून‎ अभिनंदन करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...