आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारपेठेत खरेदीचा उत्साह:मनमाडला पारंपरिक उत्साहात दसरा साजरा

मनमाड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असलेला विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण बुधवारी शहर आणि परिसरात पारंपरिक उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर प्रथमच निर्बंधमुक्त वातावरणात नवरात्रोत्सवासह दसरा आनंद व उत्साहात साजरा झाल्याचे दिसून आले. बाजारपेठेत खरेदीचा उत्साह जाणवला.

सायंकाळपर्यंत बाजारपेठेत झेंडूच्या फुलांचे भाव टिकून होते यंदा सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे झेंडूच्या फुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची आवक मंदावली होती, परिणामी अखेरपर्यंत झेंडूच्या फुलांचे भाव ७० ते ८० रुपये किलोवर टिकून होते.

शहर आणि परिसरात विविध नवीन उपक्रमांना व्यवसायांना प्रारंभ झाला. नवीन घरे, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी पसंती दिली. सायंकाळी शहराच्या विविध भागातून सहकुटुंब सहपरिवार नागरिकांनी शहराच्या बाहेर जाऊन सीमोल्लंघन केले. शमीच्या वृक्षाचे पूजन करून त्यानंतर शहरातील देवी मंदिरांसह इतर सर्व मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

बातम्या आणखी आहेत...