आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर आणि परिसरात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. कापून ठेवलेल्या पिकांसह शेतात उभ्या गहू, कांदा, पालेभाज्यांचेही नुकसान झाले. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भिती व्यक्त हाेत आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.
रात्रभर अवकाळीचा शिडकावा सुरू होता. दरम्यान, पाऊस आणि विजांमुळे मनमाड-नांदगाव रोडवरील उपकेंद्रात बिघाड झाल्याने शहराचा वीजपुरवठा १६ तास खंडित झाला हाेता. साेमवारी दुपारी तीनला वीजपुरवठा पूर्ववत झाला. साेमवारी दुपारी तासभर अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसाचा कांदा, टोमॅटो, मिरची, गहू पिकास माेठा फटका बसला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.