आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध मोर्चाचे आयोजन:अत्याचारी घटना निषेधार्थ मनमाडला आज मोर्चा

मनमाड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात आणि राज्यात होत असलेल्या अन्याय आणि अत्याचारी घटनांचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि. २२) सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह मालेगाव चौफुली येथून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात तिसरीत शिकणाऱ्या दलित विद्यार्थ्याला पाणी पिण्यावरून मुख्याध्यापक छैलसिंह याने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला.

तसेच गुजरातमधील गोधरा हत्याकांडातील उसळलेल्या दंगलीत बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील दाेेषींना गुजरात सरकारने माफी देऊन सुटका केली. नाशिक येथील एका विद्यार्थिनीवर नराधमाने अतीप्रसंग करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...