आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक पूर्ववत‎:मनमाड-नाशिक रेल्वे वाहतूक पूर्ववत‎

मनमाड‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य रेल्वेच्या नाशिक-मनमाड‎ लोहमार्गावर असलेल्या निफाड रेल्वे‎ स्थानकाजवळील रेल्वे गेट क्रं. १०१ ला‎ मंगळवारी भरधाव ट्रकने रेल्वेगाडीला‎ उच्च दाबाने वीजपुरवठा करणाऱ्या‎ खांबाला धडक दिली. त्यामुळे या‎ मार्गावरील नाशिकहून मनमाडकडे‎ येणाऱ्या व जाणाऱ्या रात्रीच्या सर्व प्रवासी‎ रेल्वागाड्या सुमारे अर्धा ते पाऊण तास‎ उशिराने धावत असल्याने प्रवाशांना‎ मनस्ताप सहन करावा लागला.‎ मंगळवारी (दि. ७) रात्री १०. ३०‎ वाजता निफाड स्थानकाजवळील रेल्वे‎ गेटला भरधाव ट्रकने रेल्वेला उच्च दाबाने‎ वीजपुरवठा करणाऱ्या ताराच्या खांबाला‎ धडक दिली.

यामुळे मोठा आवाज होवून‎ वीजपुरवठा खंडित झाल्याने वाहन‎ चालकाने पळ काढला. या घटनेची‎ माहिती रेल्वे प्रशासनाला मिळतातच‎ पथक घटनास्थळी दाखल झाले. मध्य‎ रेल्वेचे अधिकाऱ्यांनी संबंधित वाहन‎ ताब्यात घेतले आहे. या अपघातामुळे‎ विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक सुरळीत‎ करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे‎ काम हाती घेतले. सकाळपर्यंत ती पूर्ववत‎ झाली. या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीला‎ काही काळ व्यत्यय आला, मात्र सुमारे‎ दोन ते तीन तासांनंतर या लोहमार्गावरील‎ वाहतूक काही प्रमाणात व सकाळी‎ सहानंतर ती पूर्ण सुरळीत झाल्याची माहिती‎ रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.‎

बातम्या आणखी आहेत...